रत्नागिरीत पोलीस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी,:नियाझ खान

दि. ३० जून २०२५ : रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव सोहळा मंगळवारी संपन्न झाला.या वेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कामकाजाची माहिती घेत त्यांचे मन:पूर्वक कौतुक केले. त्यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला व पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर, परिमंडळ पोलीस उपअधीक्षक श्री. शिवप्रसाद पारवे, पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, सपोनि श्री. युवराज सूर्यवंशी, तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे कुटुंबीय, पोलीस अधिकारी, कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

या वेळी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१) श्री. यशवंत रघुनाथ केडगे – उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग
२) श्री. सुधीर लक्ष्मण कदम – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, खेड पोलीस ठाणे
३) श्री. दिपक शांताराम पवार – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी
४) श्री. विजय नारायण कदम – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, रत्नागिरी
५) श्री. मिलिंद राजाराम चव्हाण श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, दापोली पोलीस ठाणे

या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सर्व निवृत्त अधिकाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×