मोबाइल चोरीचा छडा; शहापूर पोलिसांकडून दोन चोरट्यांना अटक
शहापूर :अन्वर मुल्ला
दि .५: येथील गणेशनगर भागातील चेंबरमधून पाच मोबाईल हँडसेट व तीन दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा शहापूर पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. ३० जून रोजी पहाटे सुमारास शुभम पाटील यांच्या चेंबरमधील खिडकी तोडून आरोपींनी आत प्रवेश करून पाच अँड्रॉईड मोबाईल व दुचाकी चोरल्या होत्या. या घटनेवरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान वातावरणप्रवण माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी रवींद्र शिवाजी काटे (वय १९, रा. गणेशनगर, गली क्र. ९, शहापूर) आणि बाबू उर्फ जुबे (वय २२, रा. कोल्हापूर नगर, कोर्ली, ता. हातकणंगले) यांच्याकडून पाच मोबाईल हँडसेट, दोन मोटारसायकल व एक मोपेड असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहमाते श्री. भारतराव गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. आकाशसिंह जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सविता साळुंखे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार अविनाश मुनगुसे, आयुष गडकरी, रोहित डावळे, अर्जुन पाटील, शिवलिंग बांगो, चेतन बोंडे, चेतन चव्हाण यांनी केली.पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.