स्व. सौ. सरोज सुधाकर मणेरे यांची पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि ५ : श्री . डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संचालित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यालय, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा स्व. सौ. सरोज सुधाकर मणेरे यांची पुण्यतिथी नुकतीच श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे होते. तसेच समन्वयक मा. श्री. अशोक सरगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपाध्यक्ष श्री. सुभाष केटकाळे यांच्या हस्ते स्व. सौ. सरोज सुधाकर मणेरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या पवित्र स्मृतीस मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. प्राथमिक विभागातील सहशिक्षक श्री. विनोद तोडकर व विद्यार्थ्यांनी स्व. मणेरे यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ. अर्चिता कोळी यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. राजश्री राणे यांनी केले. या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐवळे, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, विविध शाखांचे विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.