कु. तेजस्विनी करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालयात लघुलेखक पदावर नियुक्ती
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ५ जुलै २०२५ :इचलकरंजी येथील कु. तेजस्विनी राजेंद्र करजगार यांची जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथे वर्ग दोन लघुलेखक पदावर नियुक्ती झाली आहे.
तेजस्विनी या सौ. रूपाली व श्री. राजेंद्र गोपाळराव करजगार यांची कन्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गंगामाई विद्यामंदिर, माध्यमिक शिक्षण गोविंदराव हायस्कूल येथे झाले. त्यांनी एम.ए. पदवी टिळक युनिव्हर्सिटी, पुणे येथून आणि एल.एल.बी. पदवी शहाजी कॉलेज, कोल्हापूर येथे पूर्ण केली. तसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट, इचलकरंजी येथून मराठी व इंग्रजी लघुलेखन अनुक्रमे १२० स्पीडमध्ये उत्तमरीत्या शिकले आहे.
या यशामध्ये त्यांना आई-वडील, भाऊ तसेच महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूटचे रशिद शेख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.