संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET-2025 मध्ये उत्तुंग कामगिरी
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि ५ जुलै: NEET-२०२५ परीक्षेत संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल अकॅडमीची विद्यार्थिनी उत्कर्षा हळींगळे हिने ७२० पैकी ६३३ गुण मिळवून ऑल इंडिया रँक १९३ तसेच कॅटेगरी रँक ४५ पटकावली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीने संस्थेचे नाव संपूर्ण देशात उज्ज्वल केले आहे.
तसेच संस्थेचे विद्यार्थी सृष्टी कदम (६१५ गुण, ऑल इंडिया रँक ६२७), आदित्य फातले (६०६ गुण, रँक ९८६), श्रेया पवार (६०५ गुण, रँक १०३१) व विकास चौधरी (६०० गुण, रँक १३६९) यांनीही उत्तम यश मिळवले.
यावर्षी संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक तर १०७ विद्यार्थ्यांनी ५०० हून अधिक गुण मिळवत उच्च निकालाची परंपरा कायम राखली.
या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक वासु सर म्हणाले, “दूरदृष्टी आणि दृढनिश्चय हीच यशाची गुरुकिल्ली आहे.” संस्थेचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.