आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्साहात साजरी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी 
दि.६:श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले.

दिनांक ६ जुलै २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मा. सुभाष केटकाळे यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. संस्थेचे समन्वयक मा. अशोक वसगडे यांचीही उपस्थिती लाभली.पारंपरिक वेशभूषा, लेझीम, टाळ व मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी पावसासाठी प्रार्थना करणारे पोस्टर्स सादर केले. “विठ्ठल रखुमाई”च्या गजराने परिसर दुमदुमला.कार्यक्रमासाठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×