संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर कापाचीवाडी रस्त्याचे उद्घाटन संपन्न
माजी आमदार श्री.सदानंद चव्हाण यांचे हस्ते पार पडले उद्घाटन
संगमेश्वर: मुजीब खान (जिल्हा प्रतिनिधी ) आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून शृंगारपूर गावांमध्ये विविध विकास कामांचे रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे,माजी उपसभापती दिलीप सावंत, राष्ट्रवादी तालुका सचिव राजेंद्र पोमेंडकर, विनोद म्हस्के आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने,माजी अध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती दिलीप सावंत, विभागप्रमुख अनंत उजगावकर, उपविभागप्रमुख श्री.दत्ताराम लाखन,उपविभागप्रमुख श्री.दिलीप सुर्वे, उपविभागप्रमुख अरविंद जाधव, सरपंच श्रेयाताई पवार, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी विनोद (बाबू) पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद मस्के, ग्रामपंचायत सदस्य, वाडीतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. रस्त्याचे काम झाल्यामुळे शृंगारपूर कापाची वाडी येथील ग्रामस्थांनी सन्माननीय माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांचे आभार व्यक्त केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.