रत्नागिरी :नियाझ खान
दि. १२ ऑगस्ट २०२५ : आज रोजी “हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलामार्फत भव्य *“तिरंगा रॅली”*चे आयोजन करण्यात आले. दुपारी ४.00 ते ५.00 वाजेपर्यंत ही रॅली पोलीस मुख्यालय रत्नागिरी ते मारुती मंदिर आणि तेथून परत पोलीस मुख्यालय असा मार्गक्रमण करून पार पडली.
या रॅलीत पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, राखीव पोलीस निरीक्षक श्री. कुळसंगे यांच्यासह पोलीस अधिकारी व 70 पोलीस अंमलदार उत्साहाने सहभागी झाले होते. देशभक्तिपूर्ण घोषणांनी रत्नागिरी शहर दुमदुमले होते.पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा रॅली यशस्वीरीत्या पार पडली