रत्नागिरी:–सचिन पाटोळे
दि:-१० मानवी हक्क आयोग मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. पोलीसमहासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे डाॕ सुहास वारके, विशेष कारागृहमहानिरीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा योगेश देसाई यांच्या प्रेरणेने विशेष
कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने बंदी बांधवांची विविधहक्क व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणविनोद जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आदीउपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी कारागृहातील बंदिस्त महिला तसेच पुरूष बंदी बांधवांना मानवीहक्कांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष कारागृहाचे प्रभारी अधीक्षक सचिन पाटील यांनी उपस्थितांचेआभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी कारागृहातील सर्व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच रत्नागिरी विशेष कारागृहातील सर्वअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.