सांगली: अय्यान पटेल
दि.१३: कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे वाहन अपघातात इजा झालेल्या मादी रानगव्यावर वनखाते कोल्हापूरकरिता सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांनी सिझेरीन ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला.
वाहन अपघातात इजा झालेल्या मादी रानगव्यावर कडगाव येथे डॉ. संतोष वाळवेकर यांच्या कॉलवरुन मिळालेल्या माहितीनुसार उपचार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागाची टीम तेथे हजर झाली. तपासणीदरम्यान मादी गाभण असल्याचे जाणवले. पण वासराची हालचाल मंदावली होती. अंतर्गत इजा व रक्तस्त्राव झाला असल्याने गव्याचा जीव वाचवण्यासाठी सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन विभाग वाळवा व वनविभाग कोल्हापूर यांच्या टीमने हे ऑपरेशन यशस्वी पार पाडले. त्यासाठी डॉ. सचिन वंजारी, डॉ संतोष वाळवेकर, डॉ. अंबादास माडकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रविण निमसे, मुकुंद वाटेगावकर या सर्वांनी मिळून गव्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. सिझरनंतर आज गव्याच्या स्थितीमधे सुधारणा झाली आहे. तिचा प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अजून उपचार सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले.