पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस

सांगली: अय्यान पटेल

दि.३: सांगली येथे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला.


यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनेतील जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. गरज भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी व योग्य उपचार करावा. झालेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबधितांना दिल्या.


यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, समित कदम, शेखर इनामदार आदि उपस्थित होते.