डीकेटीई आणि एमकेसीएल यांच्यात सामंजस्य करार संपन्न

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांसाठी २६० हून अधिक डिजीटल कौशल्य अभ्यासक्रमांची संधी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१७ः येथील डीकेटीई संस्थेने राज्यातील अग्रगण्य डिजिटल शिक्षण व कौशल्यविकास करणा-या महाराष्ट्र नॉलेज कॉरर्पोरेशन लि. पुणे (एमकेसीएल) यांच्याशी शैक्षणिक सहकार्य मजबुत करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. विद्यार्थ्यांचे नवनविन क्षेत्रातील नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान संगणाकाच्या साहयाने आत्मसात करण्याच्या उददेशाने या कराराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या करारामुळे डीकेटीईमधील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि नवोपक्रम यांचा संगम साधणारे व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार असून यामुळे स्कील इन्हॅन्समेंट, ट्रेनिंग, इंटरनशिप आणि प्लेसमेंटसाठी मदत होणार आहे.
सध्याच्या बदलत्या काळात पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्याथ्यार्ंच्या सर्वांगीण विकासासाठी तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे यामुळेच हा करार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पुणे स्थित एमकेसीएल ही संगणक तंत्रज्ञानाधारित शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवणारी संस्था असून या करारामुळे डीकेटीईच्या व इतर विद्यार्थ्यांना २६० हून अधिक मूलभूत तसेच प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रम ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणार आहेत. यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांच्या माहितीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल तसेच एआय, सायबर सिक्युरीटी, क्लाउड कम्प्युटींग, डेटा सायन्स, रिटेल बिझनेस डायनॅमिक्स, बेसीकस ऑफ डायनेमिक्स, अ‍ॅटोकॅड,तसेच विविध रोजगाराभिमुख कौशल्ये यांसारख्या विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-अभ्यासाची सवय, डिजीटल सक्षमता आणि आत्मविश्‍वास वाढीस लागणार असून भविष्यातील उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार त्यांना सक्षम बनविण्यावर विषेश भर दिला जाणार आहे.
अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे करारासाठी मार्गर्शन मिळाले. सदर करार हस्तांतरण प्रसंगी डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, डायरेक्टर डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील एमकेसीएल चे अमित रानडे, अनिल गावंडे, डीकेटीई डिप्लोमा विभागप्रमुख आर.के.वळसंग, शबाना बैरागदार, एस.ए.शेटी, पी.एस.कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो ओळी – डीकेटीई व एमकेसीएल यांच्यात सामंजस्य कराराप्रसंगी डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, डॉ. एल.एस.आडमुठे, डॉ यु.जे.पाटील एमकेसीएलचे अमित रानडे व इतर.