इचलकरंजीत महिला महोत्सव २०२६ चा उत्साहात शुभारंभ

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने च्या वतीने आयोजित ‘महिला महोत्सव २०२६’ चा रविवार, ८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. दि. ८ ते ११ मार्च या कालावधीत शहरातील युवती व महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचा शुभारंभ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रमुख उपस्थित होते.


सकाळच्या सत्रात शहरातील महिलांसाठी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अलका शेलार, डॉ. सुप्रिया माने, सरीता पांडव, मृणाली पाटील, ॲड. रमा फाटक, करिष्मा शेख, सोनल बाबर, शोभा सांगावकर, आयेशा राऊत आणि जिया शेख या महिलांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कविता वायदंडे, सुलाबाई पारसे, कांचन कांबळे, कमल रणदिवे आणि सीमा चावरे या महिला सफाई कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.


कार्यक्रमात महिलांसाठी लाठी-काठी, तलवारबाजी आणि मल्लखांब यांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सायंकाळच्या सत्रात अभिनेत्री तेजश्री यांच्या ‘वारसा लोककलेचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला नगरसेविका अलका स्वामी, धृवती दळवाई, सरीता आवळे, तेजश्री भोसले, सारिका पाटील, संगीता आलासे, रूपाली कोकणे, स्वाती लोखंडे, यास्मिन तासगावे, पद्मा सावरतकर, प्रियंका इंगवले, मोनाली मांजरे, मनीषा कुपटे, वैशाली पवार, जुलेखा पटेकरी, किरण खवरे, विजया महाजन, क्रांती आवळे, प्रमिला जावळे, रूपा बुगड, मनीषा नवनाळे, विद्या साळुंखे, नूतन मुथा, वैशाली मोहिते, सुरेखा जाधव, स्नेहल रावळ, रूपाली सातपुते, शशिकला कवडे, सपना भिसे, मेघा भोसले, ज्योती पाटील, पुनम माळी, स्मिता तेलनाडे, अरुणा बचाटे तसेच सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक तानाजी पोवार, मनोज हिंगमिरे, संतोष शेळके, शिवाजी पाटील, अभिषेक वाळवेकर, योगेश पाटील, सुशांत कलागते, नंदकुमार पाटील, मारुती पाथरवट, माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे, जहांगीर पटेकरी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पुढील कार्यक्रमांचे आयोजन
महिला महोत्सव अंतर्गत ९ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा, ‘जोडी तुझी माझी’ कार्यक्रम व होम मिनिस्टर स्पर्धा, १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान, पाककला स्पर्धा, रक्तदान शिबिर, युवतींचे सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.११ मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पॉट गेम्स व बक्षीस वितरण समारंभ होणार असून वेंकोबा मैदान येथे मुलींच्या भव्य निकाली कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.या सर्व कार्यक्रमांचा शहरातील युवती व महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.