कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. 22 : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काल राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (पक्ष- लोकराज्य जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आजपर्यंत एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.