इचलकरंजी: विजय मकोटे
. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व खोटे आहेत. सोमय्या हे कोल्हापूर येण्याचे धाडस करत आहेत. खोटे आरोप करणे त्यांनी थांबवावे अन्यथा इचलकरंजीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना जशास तसे उत्तर देतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात कराड येथे जावून जोरदार निदर्शने केली. सोमय्या हे कोल्हापूर येथे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नितीन जांभळे हे कार्यकर्त्यांसह सकाळी 9 वाजता कराड येथील गांधी चौकात जमले. त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत चौक दणाणून सोडला. कोणताही पुरावा नसताना सोमय्या हे नामदार मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करुन कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचा अपमान करत आहेत. त्यांनी बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही नितीन जांभळे यांनी दिला.
यावेळी नगरसेवक तानाजी हराळे, राजू खोत, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, रवींद्र कांबळे, युवा नेते परवेज गैबान, रमेश कांबळे, राहुल ज्वारे, शिवाजी शिंदे, अमोल भाटले, अतिश पोवार, सैफ मुजावर, अमर कोरोचीकर, असिफ शेख, विकी जावळे, फैयाज बागेवाडी, संदीप पाटील, नितीन क्षीरसागर, महेश घाटगे, पप्पू लोंढे, वाजीद बांगी, अशरफ पेंढारी, गुड्डू शेख, अनिकेत गुरसाळे, सचिन कांबळे, सुरेंद्र सपकाळ, अक्षय खांडेकर, अमोल काळे, पिंटू आंबोलकर, प्रवीण काटे, राजू अनगल, संजू बडवे, विजू माने आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.