तब्बल ४० वर्षांनी भेटले वर्ग मित्र

न्यू इंग्लिश स्कूल कसबा च्या १९८३ च्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

आरवली : सचिन पाटोळे

दि. १८ मे. : ४० वर्षांनी झाली माजी विद्याथ्यांची भेट . निमित होत गेट टूगेदरच .प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर एव्हढ्या वर्षांनीही जुने मित्र मैत्रिणी भेटू शकतात हे साध्य केले आहे संगमेश्वर नजीकच्या न्यू इंग्लिश स्कुल कसबामधे १९८३ साली दहावी झालेल्या विद्यार्थ्यांनी. या सर्वाना एकत्र आणण्याचे काम अब्दुल करीम उपाध्ये यांनी करून दाखवले.
या सर्वांचे स्नेहसंमेलन गोळवली येथील संगमेश्वर कट्टा या हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. अब्दुल करीम उपाध्ये यांनी व्हॉट्सअप वर या सर्वांचा गृप बनवला. यातून 40 ते 50 मित्र-मैत्रिणींना एकत्र केले. नंतर श्री संतोष सुर्वे यांनी या कार्यक्रमाची तयारी सुरू केली या कार्यक्रमास मुंबई, पुणे, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, गुजरात वापी येथून हि सर्व मित्र मंडळी हजर झाले. तब्बल चाळीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येणार होते. यातील बहुसंख्य लोक आजी आजोबा झाले होते. सर्व जणांचे वय 56 ते 60 च्या मध्ये होते त्यामुळे आपल्या वर्ग मित्रांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या गगनात मावत नव्हता. या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देऊन प्रमुख पाहुणे म्हणून या बॅचचे शिक्षक श्री थोरात सर हे कराड वरून एक दिवस अगोदरच उपस्थित होते. त्यांच्या सोबत श्री बागवे सर, मुख्याध्यापक श्री मणेर उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या हातून सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आपल्या बद्दल थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी भिडे ( स्वाती ताम्हणकर), गुलाब खानविलकर (सुचिता इंदुलकर) यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अब्दुल करीम उपाध्ये यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वानीच मेहनत घेतली. संतोष सुर्वे यांनी सर्व मान्यवर आणि मित्रपरिवार यांचे आभार मानले.
मुख्य कार्यक्रमानंतर सर्वांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देत शाळेतील आपल्या जुन्या वर्गात जाऊन त्यावेळच्या आठवणी जागवल्या. यावेळी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे वचन सर्वांनी दिले. तसेच पुढील वर्षी अधिक संख्येने एकत्र येण्याचे ठरविण्यात आले.