संगमेश्वर: मुजीब खान जिल्हा प्रतिनिधी
आमदार शेखर निकम यांच्यावर लिहिलेल्या आमचा नेता सर्वांचा लाडका ह्या नवीन गाण्याच्या सी डी चे प्रकाशन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले, ह्या गाण्याचे बोल हे कळंबस्ते गावच्या उपसरपंच सौ साबिया नेवरेकर यांचे पती श्री.शकील नेवरेकर यांचे असुन देवराज गरगटे व बबन जाधव यांनी संगीत दिले आहे ,या गाण्याला संदेश वारे यांचे उत्तमरित्या संयोजन व रेकॉर्डिंगला भले असुन सुरेंद्र हातखांबकर सिंथेसाथघर या कलाकारांची सुंदर साथ लाभली आहे.
कसबा पंचायत समिती गणाच्या वतीने संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे लोक प्रिय आमदार शेखर निकम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी “आमचा नेता सर्वांचा लाडका “या गाण्याच्या प्रकाशनावेळी, मी
धनाचा वापर करून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याची मेहनत आणि मतदार संघातील जनतेच्या मनातील प्रेमामुळेच मी मोठया मताधिक्याने आमदार झालो-असे उदगार आमदार शेखर निकम यांनी काढले.
त्यामुळे जे विरोधक आमदार शेखर निकम पैसे वाटून आमदार झाल्याचे सांगत होते त्यां टीका करणाऱ्यांना शेखर निकम यांनी चोख प्रतिउत्तर दिले असल्याचे बोलले जात आहे.