गडहिंग्लज: वार्ताहर
इक्रा टीचर्स ग्रुप तर्फे शिक्षक दिना निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा उर्दू विद्या मंदिर नेसरी येथे संपन्न झाला.या सभेच्या अध्यक्षस्थानी मा.मुसा सुतार सो विस्तार अधिकारी ज़िल्हा परिषद कोल्हापूर हे उपस्थित होते.
गडहिंग्लज आजरा चंदगड कागल असे चार तालुक्यातील १० एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. के बी ग्रुप १ली ते ३री एम बी ग्रुप ,४थी व ५वी ,जी बी ग्रुप ६वी ते ८ वी असे ३ ग्रुप करून स्पर्धा घेण्यात आल्या. या कर्यक्रमाची प्रस्तावना इक्रा टीचर्स ग्रुप चे अध्यक्ष श्री फैयाज अप्पासाहेब तहसीलदार यांनी केली .
या कार्यक्रमात युनूस लाडजी , अझहर मकानदार, मुबारक लाटकर, मुख्याध्यापक उपस्थित होते प्रथम द्वित्तीय त्रित्तीय क्रमान्क् ना शिल्ड सर्टीफिकेट व ४ व ५ क्रमान्क् यांना गोल्ड व सिल्वर मेडल व सर्टीफिकेट वाटप करण्यात आले. सर्व सहभागी यांना सर्टीफिकेट वाटप करण्यात आले. या कर्यक्रमात रिझवान माणगांवकर, युनूस लाडजी ,अझहर मकानदार यांनी ऑनलाईन स्पर्धा घेतले बद्दल इक्रा टीचर्स ग्रुप यांचे आभार मानले व असेच उपक्रम भविष्यात घेण्यात यावे असे मत मांडले.. नेसरी शाळा व्य.स. अध्यक्षा सौ.शबनम बागवान व हारून पिरजादे इक्रा ग्रुप चे मेबर आझारुद्दीन लतीफ असिफ मुजावर व बाबालाल अत्तर ही उपस्थित होते
मा. सुतार साहेब यांनी सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले व असंच ज़िल्हा परिषद मार्फत होणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या शाळेचे व तालुक्याचे नाव लौकिक करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. व प्रज्ञाशोध परीक्षेत ७वीत जिल्ह्यात प्रथम उर्दू चंदगड व द्वित्तीय उर्दू नेसरी मधील् विद्यार्थी यांचे सत्कार केले. सूत्र संचलन श्री आरिफ चौगले यांनी केले व आभार नियाज मुल्ला यांनी मानले…..