उस्मानाबाद जिल्ह्यातील सेमी इंग्लिश बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याचा ठराव संमत…

नगिनाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत निर्णय

तुळजापूर : प्रतिनिधी

दि: ३o जानेवारी आधुनिक लहुजी सेना उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष आदरणीय नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काल तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.
याठिकाणी मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच शोषित, वंचित समूहाचे अधिकारांचे रक्षण करण्यासाठी जागृत पणे काम करणारीसंघटना,आज_उस्मानाबाद_जिल्हा_प्रशासनाने_घेतलेल्या_सेमी_इंग्लिश_बंद_न_करता_चालू_करण्यात_यावे, यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात यावे, वेळ पडल्यास आंदोलन छेडण्याचा येईल, असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील सेमी इंग्लिश पूर्ण पणे बंद करण्याच्या मा.जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर, विचार विनीमय करून,, मा.जिल्हाधिकारी यांच्या हा निर्णय मागे घेण्यासाठी विचार करण्यासाठी चे निवेदन संघटनेद्वारे देण्यात यावे असे मत त्यांनी यावेळी मांडले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथभाऊ कांबळे, यांच्या सह तुळजापूर पंचायत सभापतीचे माजी सभापती तथा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव गायकवाड साहेब, राज्य प्रवक्ते लक्ष्मणभाऊ क्षीरसागर, राज्य सल्लागार अँड अजय कांबळे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष कचरूभाऊ सगट, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तुलशीताई बनसोडे, युवक जिल्हाध्यक्ष महेश भाऊ देडे, जिल्हा संघटक कुंडलिकभाऊ भवाळ, मा.अंकुशजी पेठे साहेब, यु.तालुकाध्यक्ष शंकर भाऊ कांबळे , महिला आघाडी तालुकाध्यक्ष आरतीताई लोंढे, मृणालभैय्या कांबळे, पृथ्वीभैय्या कांबळे, विशाल भाऊ कांबळे, विशाल भाऊ लोंढे, कृष्णा डोलारे ,अमर देडे, विजय कांबळे, बाबा वाघमारे शिवाजी कांबळे, कुंडलिक सगट , बिभीषण मिसाळ आदींसह अनेक प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते येथे उपस्थित होते.