सिंधुदुर्ग:प्रतिनिधी
दि: १४ फेब्रुवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती आफ्रीन करोल यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा पदासाठी अर्ज दाखल केला होता.आज दिनांक १४ रोजी या निवडणुका पार पडुन काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती आफ्रीन करोल यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे राणे यांच्या बालकिल्ला असलेल्या मतदार संघातील कुडाळ नगरपरिषदेवर कॉग्रेसने आपला झेंडा फडकावला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना भाऊ पटोले यांचे मार्गदर्शन व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या बहुमोल सहकार्यामुळेच कुडाळमध्ये काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडुन येऊ शकला अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहप्रभारी श्री.शशांक बावचकर यांनी दिली.भारतीय जनता पक्षाने अनेक पध्दतीने नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न केले.तरीसुध्दा शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक एकसंघ राहीले असुन भविष्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुडाळचा कायापालट करून विकास कामांमध्ये कुडाळ अग्रेसर राहील असे श्री.बावचकर यांनी म्हटले.यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल,रवी वासुदेव, दिलीप पाटील, ओंकार आवळकर, प्रमोद नेजे, योगेश कांबळे उपस्थित होते.