चिपळूण तालुक्यात तीन हजार फाईल फोल्डरचे वाटप

काँग्रेस चे अनुसुचित जाती कमिटी समन्वयक, रत्नागिरी जिल्हा प्रभारी सुनील सावर्डेकर यांच्या पुढाकार

आरवली: ता.संगमेश्वर(उदय पवार)
काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व अनुसुचित जाती कमिटी समन्वयक, रत्नागिरी जिल्हा प्रभारी व चिपळूण तालुक्यातील कळवंडे गावचे सुपुत्र सुनील सावर्डेकर यांच्या माध्यमातून
चिपळूण तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तीन हजार फोल्डर फाईल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानुसार शनिवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी कळंवडे बौद्धवाडी, कातळवाडी, रोहिदासवाडी येथे तसेच १२ सप्टेंबर रोजी कोल्हेखाजन येथील विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल वाटप करण्यात आले.उर्वरित पालवन, खेर्डी, सावर्डा, तुरभव याठिकाणी देखील वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
        कार्यक्रम प्रसंगी मधुकर सावर्डेकर, अरविंद खेरटकर,सतिश हरिश्चंद्र जाधव,देवेंद्र जाधव,दयानंद जाधव,विश्राम काशिराम पवार,राजेंद्र काशिनाथ जाधव, रवी अनंत जाधव, स्मिता सावर्डेकर,महिला कमिटी,अनघा अमोल जाधव,रेश्मा रवी जाधव,  भाग्यश्री भाविक जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.