जवाहर कारखाना कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वाटप

जवाहर कारखाना आणि जवाहर कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 3 लाख 20 हजार रुपये इतक्या रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात

इचलकरंजी: विजय मकोटे
सन 2021 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत 75 टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कर्मचार्‍यांच्या गुणी मुलांचा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एकूण 102 मुला-मुलींना जवाहर कारखाना आणि जवाहर कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 3 लाख 20 हजार रुपये इतक्या रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांना साखर, मोलॅसिस आणि इथेनॉल सेक्टरमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल टेफलाज यांच्यावतीने शुगर युथ स्टार ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जवाहर परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी, संपूर्ण महाराष्ट्रात जवाहर कारखान्याने वेगळा ठसा उमटविलाआहे.कामगारांच्याबाबतीत सुरुवातीपासूनच विविध कामगार कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवण्यावर भर दिलेला आहे. त्या माध्यमातूनच कामगारांच्या मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतीवर्षी कारखाना व कामगार संघटना यांच्यामार्फत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. याचबरोबर कामगार कल्याण मंडळामार्फतही नववी नंतर कामगारांच्या मुलांना प्रतीवर्षी महाराष्ट्रात शिष्यवृत्ती दिली जाते. त्यातही जवाहरकामगारांच्या मुलांना जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून दिली जाते. विद्यार्थ्यांनी यशाची ही घोडदौड अशीच पुढे सुरु ठेवावी, अशा शुभेच्छा दिल्या.
स्वागत व प्रास्ताविक कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी केले. आभार संघटनेचे उपाध्यक्ष बाळासो सुर्यवंशी यांनी मानले. सूत्रसंचालन आण्णासो गिरी यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, संचालक सर्वश्री आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, अभयकुमार काश्मिरे, सुकुमार किणींगे, शितल आमण्णावर, दादासो सांगावे, सुमेरू पाटील, गौतम इंगळे, संजयकुमार कोथळी तसेच कामगार संघटनेचे सर्व सदस्य आणि कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.