अमरावती: प्रतिनिधी
दि ७ मार्च :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना आर्थिक स्तरावर आत्मनिर्भर बनवन्यासाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो व नगर परिषद दर्यापुर यांच्या सयुंक्त विद्यमाने केंद्र सरकार तर्फे महिलासाठी प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजना विषयी माहिती देण्याकरिता विशेष महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
केन्द्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो अमरावती तर्फे सरकारच्या विविध योजना, उपक्रम, नीती-धोरनाची माहिती गावातील शेवटच्या पर्यंत पोहचवन्याचे कार्य केले जाते.
iयाप्रसंगी प्रमुख वक्ता छतीसगड राज्याचे राज्य वित्तीय समावेशन समिती सदस्य, हरगोविंद चौबे म्हणाले केंद्र सरकार तर्फे महिलांचा आर्थिक स्तर मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. जसे स्टार्ट अप इंडिया, स्टैंड अप इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि मुद्रा योजना, जीवन ज्योती योजना या सारख्या अनेक योजनां राबविल्या जात आहेत. संबधित योजनाची परिपूर्ण माहिती नसल्याने मोठ्यप्रमाणात महिला लाभापासून वंचित राहतात. विशेषकरुन ग्रामीण भागातील महिला व महिला बचत गट विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडले जात नाही. बैंक तर्फे आर्थिक योजनाचा फ़ायदा घेताना येना-या अडचनी व उपाययोजना विषयी मेळाव्यात सविस्तर माहिती दिली.
नगर परिषद दर्यापुरचे मुख्याधिकारी पराग वानखड़े यानी नगर परिषद तर्फे राबविल्या जात असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजना व नाविन्यपूर्ण उपक्रमा विषयी माहिती दिली.यावेळी पाककला ,वेशभूषा, गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, इत्यादी उपक्रम घेण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन मुख्यधिकारी पराग वानखडे यांनी केले.. विजेत्या स्पर्धकांना बक्षीसं देण्यात आली.
कार्यक्रमास क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, बँकेचे अधिकारी भूषण वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्याला बचतगटाच्या महिलांनी मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Post Views: 176