इचलकरंजी: विजय मकोटे
शासनाने आपल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यास या वर्षा पासुन दैनंदिन ऊस गाळप क्षमता ५,००० मे. टना वरुन १०,००० मे. टन करणेस मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारखाना पुर्ण क्षमतेने चालू रहावा यासाठी ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस या कारखान्या कडे गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले. कारखान्याची सन २०२०-२१ सालची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी आॕनलाईन ( व्हिडीओ काॕन्फरन्सिंग द्वारे ) खेळीमेळीत पार पडली, यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
पी.एम. पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, स्व. रत्नाप्पाण्णांनी सभासद व कामगारांच्या कल्याण्यासाठी कारखाना सुरु केला. त्यांचे स्वप्न आज साकारताना दिसत आहे. कारखान्याचा कारभार पारदर्शक सुरु असुन सभासद , तोडणी – वहातुक कंत्राटदार, कामगार यांच्या कारखान्यावरील विश्वासामुळे दैनंदिन गाळप जोरात सुरु आहे. यावर्षी कारखान्याने ९ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असुन आज अखेर १८ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. कारखान्याने सन २०२०-२१ सालात गळीतास आलेल्या ऊसाला प्रतीटन ३०४०/- रुपये प्रमाणे जिल्ह्यात उच्चांकी असा दर दिला असुन संपूर्ण बिले आदा केली आहेत. यावर्षीच्या एफआरपी दराबाबत शासनस्तरावर जो निर्णय होईल तो आंम्हास बांधिल राहील असेही ते म्हणाले. यानंतर सभासदांच्या सूचनाना त्यानी समर्पक ऊत्तरे दिली.
प्र. का. संचालक एन. वाय. भोरे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजे, संचालक धनगोंडा पाटील, कुमार खूळ, कल्लू पिराई, एम आर पाटील, सुनिल तोरगल, प्रताप नाईक, प्रमोद पाटील, प्रताप उर्फ बाबा पाटील, संतोष महाजन, भूपाल मिसाळ, प्रकाश खोबरे, सौ. रंजना निंबाळकर, सौ. शोभा पाटील आदि उपस्थित होते. संचालक रावसाहेब भगाटे यांनी मानले.