इचलकरंजी : संजय आंबे
‘आपल्या मानवी जीवनाला सर्व बाजूने प्लॅस्टीकने व्यापले आहे अत्यावश्यक साठी प्लॅस्टीकचा वापर समर्थनीय आहे. पण त्याचा अतिरेक झाल्याने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आज नगरपालिकेच्या कचरा गाडीतून प्लॅस्टिक कचरा सर्वाधिक गोळा होतो तो ओल्या कच-याबरोबर असल्याने वेगळे करणे आणि रिसायकलींग करणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचा वापर कमीतकमी करणे आवश्यक आहे, असे मत इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अँड सौ. अलका स्वामी यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कुलमध्ये आयोजीत प्लॅस्टीक मुक्ती अभियान कार्यक्रमात प्रमुख पाहूण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन हरीष बोहरा होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले. ‘विदयार्थिनींनी प्लॅस्टीक पिशव्या वापरणे पूर्ण बंद करावे. कापडी पिशव्या वापराव्यात, प्लॅस्टीक मानव व पाळीव प्राण्यांच्याही आरोग्याला घातक आहे.
मुखाध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्या म्हणाल्या, ‘प्लॅस्टीक रिसायकल मिशन या संस्थेचे पर्यावरण रक्षण आणि जागृतीसाठी महत्त्वाचे योगदान आहे. आमची शाळा अशा विधायक उपक्रमांना प्रतिसाद देत असते. विदयार्थिनींच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे.’
आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल सुर्वे यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. वंदना बडवे, डॉ. आरती कोळी यांनीही मार्गदर्शन केले. शाळेच्या विदयार्थिनी व शिक्षकांच्या माध्यमातून जमविलेल्या प्लॅस्टीक पिशव्या व बॉटल प्लॅस्टीक रिसायकल मंचकडे सोपविण्यात आल्या. यावेळी सदर संस्थेच्या विश्वस्त डॉ. ज्योती बड़े, सौ. रेणू कडाळे, श्री. डांगरे, प्रशलेचे उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, आर.बी. ए.आर. सुतार, एस. एन. पोवार, सौ.जी. पी. पाटील, श्रीमती एन. एम. कांबळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थिनी उपस्थित होत्या. पर्यवेक्षिका सौ. एस. एस. भस्मे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शेखर शहा यांनी केले.