कडवई: –मुजीब खान
चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी पाटीलवाडी कडवई येथील चंद्रकांत दादा जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
राजकीय पक्षांचे पुढारी तसेच कार्यकर्ते चंद्रकांत दादा जाधव यांच्या घरी येवुन गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कडवई पाटीलवाडी येथील जाधव यांच्या घरी २१ दिवसाच्या गणपतीचे आमदार शेखर निकम,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅक संचालक राजेंद्र सुर्वे,दत्ताराम ओकटे,संतोष भडवळकर,पत्रकार संतोष येडगे,तुकाराम येडगे,मोहन ओकटे,विठ्ठल येडगे,शशिकांत मोहिते, प्रमोद कडवईकर इइत्यादी अनेक मान्यवरांनी जाधव यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतलं.