माखजन-कोल्हापूर एस टी गाडी पुन्हा सुरू करा -अशोकराव जाधव

काँग्रेस आणि शेतकरी -कष्टकरी संघटनेची मागणी

देवरूख

देवरूख एस टी डेपो चालू झाल्या पासुन सातत्याने चालू असलेली गाडी आणि ऊत्तम भारमान देणारी एस टी गाडी गेल्या दहा वर्षा पुर्वी पर जिल्हातील डेपोच्या गाडयांना भारमान मिळावे म्हणून बंद केली गेली आणि संगमेश्वर तालुक्यातीय करजुवे , माखजन ते आरवली ते तुरळ( कडवई ) संगमेश्वर , देवरूख , साखरपा या रस्तावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला त्यामुळे ऊत्तम भारमान असलेली माखजन कोल्हापूर , कोल्हापूर -माखाजन गाडी पुन्हा चालू करावी अशी मागणी अशोकराव जाधव काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि शेतकरी -कष्टकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी केली आहे .

खरे पाहता माखाजन – कोल्हापूर गाडी बंद करणे ही चुकच होती पण ती चुक मागील डेपो मॅनेजर यांनी केली होती ती सुधारूण सध्याचे डेपो मॅनेजर श्री राजन पाथरे हे नक्कीच या बाबत सकारात्मक विचार करतील असे म्हणने बैठकीस ऊपस्थित असलेल्या मोहन चव्हाण यांनी मांडले या बाबत डेपो मॅनेजर देवरूख यांना निवेदण द्यायचे असा ठराव दत्ताजी परकार अध्यक्ष काँग्रेस तालुका संगमेश्वर यांनी मांडला, त्यास अनुमोदन ऊत्तम गायकवाड अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा शेतकरी कष्टकरी संघटना यांनी दिले . सदर निवेदण अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली दत्ता परकार, विश्वनाथ किल्लेदार , ऊदय पवार , बाबू डेरे ,ऊत्तम गायकवाड , दिपक दळवी , कॅप्टन हनिफ खलपे , इलियास मापारी , दिलीप पेंढारी , अब्बास आंबेडकर , मोहन चव्हाण बिल्कीश मुकादम , फारूक मुकादम,सुर्यकान्त पवार , नाना संसारे , मुझ्झफ्फर (बावा ) मुल्ला , शिरगावकर ,अनंत धामणे , विलास कदम , शांताराम बल्लाळ ,सादिक नायकवडी , मुजीब खान ,शशिकांत चव्हाण , अनिल भुवड , मंगेश सोनवडेकर , सुरेश शिंदे , बाबू रेडीज ,आणि काँग्रेस आणि शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळा सहीत निवेदण देणार आहेत.

221