कोल्हापूर:प्रतिनिधी
दि २७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ च्या वतीने म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम अंतर्गत शिरोळ तालुका उदगाव चिलिंग सेंटर अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक दूध संस्था चेअरमन,सचिव व निवडक दूध उत्पादक यांचा म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा मेळावा घेण्यात आला. यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, संजय पाटील यड्रावकर (उप नगराध्यक्ष जयसिंगपूर), अमर पाटील (नगराध्यक्ष शिरोळ) प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना विश्वास पाटील म्हणाले कि पुणे व मुंबई बाजार पेठेत गोकुळच्या म्हैस दुधाला मागणी जास्त असून या अनुषंगाने संघाकडून म्हैस दूध वाढ कार्यक्रम राबिविले जात आहेत तरी दूध उत्पादकांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन संघाकडून व के.डी.डी.सी. बँकेकडून केले जाईल. या दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत के.डी.सी बँक आपल्याला ५०० कोटी कर्ज आण्णासाहेब पाटील मंडळाकडून देण्यास तयार आहे. गोकुळच्या दूध उत्पादकांनी संघामार्फत राबवलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन म्हैस दूध उत्पादन वाढीवर भर द्यावा ज्यामुळे वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उदिष्ट सध्या होईल असे मनोगत व्यक्त केले.
संजय पाटील – यड्रावकर उप नगराध्यक्ष जयसिंगपूर म्हणाले कि गोकुळ दूध संघ हि संस्था सामान्य दूध उत्पादकांची आहे. त्यासाठी दूध उत्पादकांना चांगला परतावा देऊन त्यांनी आर्थिक स्थैर्य दिले बद्दल संघाचे आभार मानले व दूध उत्पादकांनी म्हैस दूध वाढीसाठी म्हैस खरेदी करून म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक शशिकांत पाटील – चुयेकर यांनी केले व माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके,किसन चौगले,माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी मानले.
यावेळी चेअरमन श्री विश्वासराव पाटील माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे , संजय पाटील यड्रावकर (उप नगराध्यक्ष जयसिंगपूर), अमर पाटील (नगराध्यक्ष शिरोळ),गोकुळचे संचालक अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, बयाजी शेळके, दिलीप पाटील (माजी चेअरमन गोकुळ दूध संघ), तातोबा पाटील (नगरसेवक शिरोळ), विठ्ठल पाटील (नगरसेवक शिरोळ),संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे व के.डी.डी.सी. बँकेचे अधिकारी उपस्थित होते.