रत्नागिरी: सिद्धेश मराठे
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाअंतर्गत कार्यालय परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
“जिल्हा परिषद परिसरामध्ये नियमितपणे स्वच्छता ठेवण्याचा आपण संकल्प करुया “असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी स्वच्छता श्रमदान मोहीमे अंतर्गत कार्यालयीन स्वच्छता उपक्रमामध्ये सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांना केले व सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी या विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत कार्यालय परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी मोठया प्रमाणात iउपस्थित राहून जिल्हा परिषद आवारातील ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक बाटल्या, काचेच्या बाटल्या आदी कचरा गोळा करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. परवडी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम.निशादेवी वाघमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख व कर्मचारी हे उपस्थित होते. या मोहीमेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ/सल्लागार व कर्मचारी यानी मोठया प्रमाणात परिश्रम घेतले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाअंतर्गत कार्यालय परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
“जिल्हा परिषद परिसरामध्ये नियमितपणे स्वच्छता ठेवण्याचा आपण संकल्प करुया “असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी स्वच्छता श्रमदान मोहीमे अंतर्गत कार्यालयीन स्वच्छता उपक्रमामध्ये सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांना केले व सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी या विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत कार्यालय परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून जिल्हा परिषद आवारातील ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक बाटल्या, काचेच्या बाटल्या आदी कचरा गोळा करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. परवडी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम.निशादेवी वाघमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख व कर्मचारी हे उपस्थित होते. या मोहीमेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ/सल्लागार व कर्मचारी यानी मोठया प्रमाणात परिश्रम घेतले.