रुई: संजय आंबे
रुई ता. हातकणंगले येथील सहारा नगर मधील सायगोंडा रामगोंडा पाटील विद्या मंदिर रुई जिल्हा परिषदेच्या शाळेतील नव्याने बांधण्यात आलेल्या 2खोलीचे उद्घाटन सोहळा पार पडला,उद्घाटन मा.समाज कल्याण व महिला बाल कल्याण सभापती सौ.वंदनाताई मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना हातकणंगले, रुई मधील सर्वव अंगणवाडी यांनी पोषणावर आधारित विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . यामध्ये रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,पाककृती स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा, घेण्यात आल्या. सर्व स्पर्धा पोषणावर आधारित होत्या. तसेच झिम्मा फुगडी स्पर्धा देखिल आयोजित करण्यात आल्या होत्या या वेळी प्रथम क्रमांक संयुक्त किशोरी मुलींचा गट, साठे नगर ,रुई,द्वितीय क्रमांक श्रप्तश्रुंगी महिला गट ,सहारा नगर, रुई,तृतीय क्रमांक शिवकंन्या महिला गट ,गाव भाग रुई ,यांनी नंबर पटकावला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.करिष्मा मुजावर -सरपंच रुई सौ.एस.एस.बुवा-सुपरवायझर सौ.स्नेहल गलगले-मा.उपसभापती गडहिंगलजश्री. विठ्ठल कांबळे-ग्रामसेवक रुई श्री. युनूस मकानदार-उपसरपंच रुई,श्री अभयकुमार काश्मिरे-मा.सरपंच श्री चंद्रकांत मांगलेकर,श्री हुपरे सरश्री नंदकुमार साठे-मा.सरपंच श्री उस्मान कुन्नुरे-ग्रा. पं.सदस्य श्री संदीप दोरूगडे – ग्रा.पं.सदस्य श्री वैभव पोवार – श्री अनिल साठे,श्री सुभाष चौगुले-मा.उपसरपंच सौ.सारिका मगदूम मा.ग्रा.पं.सदस्यसौ.अनिता कुंभार,श्री कल्लाप्पा चौगुले श्री सरदार पठाण सौ.छप्रे वहीनी श्री दस्तगीर बाणदार बाबा श्री शामराव यादव बापू ,श्री येसने सर-मुख्याध्यापक ,श्री व्हणवाडे सरश्री ,निंबाळकर सर,सौ.पाटील मॅडम ,सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस भागातील सर्व महिला बचत गट उपस्थित होते विशेष सहकार्य न्यु तिरंगा ग्रुप श्री नवश्या गणपती सहारा नगर रुई यांंचे लाभले.