लांजा :नसिर मुजावर
शहरातील श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन प्रणालीद्वारे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रभाकर कोळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे व्यवस्थापक श्री.विजय घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडली. पतसंस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेचा कामकाज वृतांत वाचून कायम करणे. संस्थेच्या ३ मार्च २०२१ अखेर पूर्ण झालेल्या वर्षाला संचालक मंडळाने सादर केलेल्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रके स्विकारणे. ३१ मार्च २०२१ मध्ये झालेल्या निव्वळ नफ्याची वाटणी मंजूर करणे. सन २०१९-२० चे लेखापरीक्षणाच्या पूर्तता अहवालाची नोंद घेणे व सन २०२०-२१ चे लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे. सन २०२१-२०२२ या वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. सन २०२०-२१ च्या अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. संचालक मंडळातील सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी वैधानिक लेखापरीक्षक नियुक्ती करणेस मान्यता देणे. संस्था उपविधी पोटनियमामध्ये संचालक मंडळाने सुचविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करणे व त्या संमत करणे. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या कामांचा विचार करणे इत्यादी विषय ऑनलाईन सभेत मांडण्यात आले. पतसंस्थेला ८ लाख १५ हजार रूपयांचा ढोबळ नफा झाला. आवश्यक तरतुदी करुन २ लाख ८ हजार रुपये इतका नफा झाला आहे. संस्थेच्या सभासदांना ५ टक्के लाभांश देण्यात येईल अशी माहीती यावेळी देण्यात आली.
पतसंस्थेची प्रगती संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि सभासदांवर अवलंबून असते. ही सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक, सर्व संचालक व कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.