समृध्द लखपती गाव म्हणून संगमेश्वर तालुक्यातीलदेवडे गावाची निवड

सभापती जया माने यांच्या उपस्थित कार्यशाळा संपन्न

 

देेेेवरुख :मनोज चव्हाण 

जिल्हा परिषद रत्नागिरी,पंचायत समिती संगमेश्वर व ग्रामपंचायत देवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत देवडे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत समृध्द बजेट 2022/23 आराखडाबाबत मनरेगा आपल्या दारी कार्यशाळा संपन्न झाली.

ही योजना देवडे या गावात प्रभावीपणे राबविणेसाठी मा.सभापती महोदय यांच्या शिफारशीनुसार देवडे या गावाची संगमेश्वर तालुक्यात निवड झाली असून या कार्यशाळे प्रसंगी
मा.सभापती जया शेठ माने ,जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रजनीताई चिंगळे , पंचायत समिती सदस्य संजय कांबळे,पंचायत समिती रत्नागिरी गटविकास अधिकारी श्री जाधव (नरेगा),नायब तहसीलदार पंडित यांच्या उपस्थित पार पडली

यावेळी विस्तार अधिकारी घुले ,गटशिक्षण अधिकारी त्रिभुवने , तालुका कृषी अधिकारी शिवगण ,तालुक्यातील सर्व खाते  प्रमुख,देवडे गावचे सरपंच श्री राजू राणे,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सदस्या, देवडे गावचे ग्रामसेवक श्री शेळके भाऊसाहेब ,तंटामुक्त अध्यक्ष श्री प्रदीप बेर्डे,मंडळ अधिकारी कोंडगाव जोशी,तलाठी,आरोग्यसेवक,शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका सर्व, गावचे पोलीस पाटीलअडबल,कृषीसेवक,वनपाल , गावचे गावकर डॉ शशिकांत चिंचवलकर ,दयानंद चिंचवलकर , माजी उपसरपंच भाई बेर्डे तसेच गावातील जेष्ठ,महिला बंधू भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ही योजना देवडे गावात यशस्वीरीत्या राबविण्यात येणार आहे. असा विश्वास सभापती जया माने यांनी व्यक्त केले