कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेच्यावतीने पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा संघटनेच्यावतीने येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी
असोसिएशन स्माँल अँड मिडीयम न्यूज पेपर आँफ इंडियांचे राज्य सचिव गोरख तावरे, सातारा जिल्हाध्यक्ष खंडू इंगळे, दैनिक प्रितीसंगमचे संपादक शशिकांत पाटील, जिल्हा सचिव संतोष शिंदे, खजिनदार शंकर शिंदे, दैनिक लक्ष्मीपुत्रचे संपादक सुलतान फकीर उपस्थित होते.
दरम्यान असोसिएशन स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया ही संघटना राष्ट्रीय पातळीवर काम करीत असून त्याची महाराष्ट्रात शाखा आहे. ही शाखा वृत्तपत्रांसाठी करत असलेल्या कामाची माहिती उपस्थित संघटनेच्या शिष्टमंडळाने उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांना दिली.
प्रिंट मीडियामध्ये सध्या काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान प्रिंट मीडियावर अद्याप वाचकांची विश्वासार्हता कायम आहे. कोविडमुळे ज्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे निधन झाले, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत राज्य शासन देत आहे. याबाबत माझी सहकार्याची भूमिका असेल सांगून उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर म्हणाले, शासकीय योजना, माहिती याचबरोबर विविध विषयावर आतापर्यंत मी लिखाण केलेले आहे. यापुढे असे लिखाण माझ्या हातून चालू राहील, त्याला वृत्तपत्रांनी योग्य ती प्रसिद्धी द्यावी. अशी अपेक्षाही उपसंचालक राजू पाटोदकर यांनी यावेळी व्यक्त केली.
पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी ही भूमिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची आहे. यासाठी दैनिकाच्या संपादकांनी पत्रकारांबाबत सकारात्मक भूमिका ठेवून अधिस्वीकृती देण्यासंबंधाने चौकटीतील सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर निश्चित अधिस्वीकृती प्राप्त होऊ शकते. मात्र जे चौकटीत बसत नाहीत याबाबत कोणीही त्याचा आग्रह धरू नये. चौकटीत बसणाऱ्या कामासाठी मी सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे.अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.