इचलकरंजीत स्त्री जागर अंतर्गत समाज प्रबोधन

इचलकरंजी मनोज खेतमर
    दि : २१ येथील राष्ट्रसेवा दल व मृगेंद्रआण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्या मंदिर आणि विद्यानिकेतन हायस्कूल तसेच रोटरी सेंट्रल एक्झिाक्युटीव्ह प्रोबस क्लब यांचे संयुक्त विद्यमाने स्त्री जागर अंतर्गत मुलीची लघुनाटिका नुकतीच रोटरी भवन मध्ये सादर केली.
दसर्‍यानिमित्त आयोजित या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून परिसरातील विविध ठिकाणी ही नाटिका सादर करुन समाजामध्ये स्त्रियांच्या जन-जागरणाचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी सुलतानपुरे हायस्कूलमधील मुलींनी स्थानिक राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्याच्या सहकार्याने ही नाटिका बसविण्यात आली. प्रोबस क्लबच्या ट्रेझरर व सुलतानपुरे हायस्कूलच्या शाळा कमिटीच्या अध्यक्षा सौ. हेमल सुलतानपुरे यांचे प्रयत्नाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी या नाटिकेच्या संयोजिका सौ. रिटा रॉड्रीक्स, सौ. सुषमा साळुंखे, कुरणे सर, मुख्याध्यापक देवमोरे, हरीकृष्ण आटकीला यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, विद्यमान अध्यक्ष विलासराव पाडळे, सहसेक्रेटरी सौ. सुजाता कोईक, खजिनदार सौ. हेमल सुलतानपुरे यांचे हस्ते व उपाध्यक्ष गजानन शिरगुरे, सेक्रेटरी शिवबसु खोत, कमिटी सदस्या सौ. प्राजक्ता होगाड़े, सौ. वर्षा कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी क्लब सदस्य प्रकाशराव दत्तवाड़े, डी. एम. बिरादार, काशिनाथ जगदाळे, सुर्यकांत बिडकर, एम. के. कांबळे, रामदास चौगुल्ले, प्रकाश जगताप, सुनिल कोष्टी, प्रदिप लडगे, सौ. संगिता लडगे, प्रमोदिनी देशमाने, सौ. मिरा जोशी, सौ.शालिनी जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.