इचलकरंजी: संजय आंबे
दि:१३ नोव्हेंबर येथील सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँकेत व्यवस्थापन मंडळ (बीओएम) स्थापन करण्यात आले ओ. या व्यवस्थापन मंडळामध्ये विद्यमान संचालक मंडळातील तीन व संचालक मंडळाबाहेरील विशेष ज्ञान, लेखापरक्षिण, वस्त्रोद्योग व सहकार क्षेत्रातील अनुभवी तीन अशा सहा सदस्यांची निवड चेअरमन सुनिल पाटील, व्हा. चेअरमन महादेव कांबळे, सीईओ अशोक पाटील व संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली.
आरबीआयची मार्गदर्शक तत्वे व बँकेच्या पोटनियमास अनुसरून व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याता आले. विद्यमान संचालक मंडळातील अजित शिवाप्पा कोईक, डॉ. प्रद्युम्नकुमार वसंत कडोले व मनिष बालकिसन पोरवाल सीए तसेच संचालक मंडळाबाहेरील विशेष ज्ञान, लेखापरीक्षण, वस्त्रोद्योग व सहकार क्षेत्रातील अनुभवी तात्यासो राजगोंडा पाटील (सहकार व बँकिंग), धिरज प्रमोद देशपांडे सी. ए. (लेखापरिक्षण व बँकिंग) आणि डॉ. रविंद्र नेमगोंडा पाटील (वस्त्रोद्योग अभियांत्रिक) असे व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यात आले. व्यवस्थापन मंडळच्या अध्यक्षपदी अजित कोईक यांची निवड करण्यात आली. व्यवस्थापन मंडळ हे बँकेच्या धोरणात्मक निर्णय, जनतेच्या पैशाचे विश्वस्त म्हणून महत्त्वाची भुमिका बजावणार असून यावर पुर्णपणे नियंत्रण रिझर्व्ह बँकेचे असणार असल्याने सहकारी बँकिंग क्षेत्रास शिस्त बसेल व सहकार क्षेत्र टिकेल. व्यवस्थापन मंडळात 51 टक्के तज्ञ संचालक असणार आहेत. नव्या नियमावलीनुसार बँकेचे संचालक व कर्मचारी बँकेच्या धोरणाशी एकनिष्ठपणे कामकाज करून अधिक सुसूत्रता येवून खातेदार व ठेवीदार यांचा विश्वास अधिक दृढ होणेस मदत होईल. अल्पावधीत सन्मती बॅक एक हजार कोटीचा व्यवसाय करणार असून बँक डिजीटल बँकिंग क्षेत्रात उतरणार आहे. लवकरच युपीआय, पेटीएम, गुगल पे या सारख्या सुविधा देण्यास सज्ज होत आहे. सन 2022 मध्ये 10 कोटी भागभांडवल, ठेवी 500 कोटी, कर्जे 300 कोटी, कासा ठेवी 30 टक्के हे उद्दिष्ठ ठेवून बँक पुढील वाटचाल करीत आहे. 30 सप्टेंबर 2021 अखेरील बँकेची सांपत्तिक स्थिती सभासद 12815, ठेवी 31522.26, कर्जे 19915.82, गुंतवणूक 12330.71, भागभांडवल 687.16, खेळते भांडवल 36413.66 व राखीव निधी 2403.81 इतका आहे.