संगमेश्वर:-तैमिना वणू
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे संस्थापक अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांना इचलकरंजी येथील प्रसिद्ध वृत्तपत्र महालक्ष्मी टाइम्स यांचे वतीने मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोरोना कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.आमदार शेखरजी निकम,निव्रुत्त वायुसेना अधिकारी पुणे आर बी पाटील, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, महालक्ष्मी टाइम्स चे संपादक फिरोज शेख, कॅप्टन हनीफ खलपे,मजीद नेवरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार स्व.दिलावर कोंडकरी यांची कन्या आस्फीया कोंडकरी हिने स्वीकारला.यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे उपाध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे, सचिव युसुफ शिरगावकर, संगमेश्वर पूर्व शाखेचे अध्यक्ष बशीर खान, उपाध्यक्ष मंजूर काद्री ,सचिन पाटोळे,नियाज खान,मुजीब खान,वहाब दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी शकील गवाणकर, जमीर खलफे, युसुफ शिरगावकर, यांचा सत्कार करण्यात आला तसेच बशीर खान, मंजूर काद्री,यांचा ही कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
संगमेश्वर तालुक्यात कोरोना कालावधीत ज्यांनी ज्यांनी काम केले अशा सर्वांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या कामाची प्रशंसा करुन आपण यापुढे ही संपूर्ण पणे सहकार्य करु असे आमदार शेखरजी निकम यांनी सांगितले.