इचलकरंजीः–अश्फाक फकीर
दि .१० : श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२३-२४ सालाची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. १० ऑगष्ट २०२४ रोजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, तांबे माळ, इचलकरंजी येथे खेळीमेळीत पार पडली.
सुरुवातीस आद्यतिर्थकर आदिनाथ भगवान व संस्थापक स्व आप्पासो मगदूम यांचे फोटोचे पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत व्हा. चेअरमन श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले यांनी केले. तर श्रध्दांजली ठराव संचालक श्री. मधुकर देवाप्पा मणेरे यांनी मांडला. सभेस प्रमुख अतिथी म्हणुन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), मा.श्री. स्वप्नीलजी आवाडे विषेश अतिथी उत्तम आवाडे, सौ. वैशाली आवाडे, पी. एम. पाटील, मिलींद कोले, सुधाकरजी मणेरे, गुंडाप्पा रोजे, बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा यांनी १०% डिव्हीडंड जाहिर केला तसेच अहवाल सालातील बँकेच्या आर्थिक बाबींचा आढावा घेतला.डिझीटल बॅकींग ही आधुनिक बँकींगमधील क्रांती म्हणावी लागेल. तंत्रज्ञान खर्चिक असले तरी बँकेने ग्राहकांना नवनविन पेमेंट सुविधा जसे मोबाईल बँकींग तसेच युपीआय च्या माध्यमातून गुगल पे, फोन पे, क्यु.आर कोड, इ. पेमेंट सुविधा उपलब्ध केले असून सध्या ग्राहक ही सुविधा वापरत आहेत. सध्याच्या बँकींगमधील रिझर्व्ह बँकेकडील बदल व त्याअनुषंगाने दंडात्मक कारवाई वाढलेचे दिसून येते. परंतु आपल्या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या Financially Sound and Well Managed (FSWM) बॅकींगमधील चांगली गुणवत्ता व व्यवस्थापन निकषामध्ये खरी उतरल्याने बँकेला नविन शाखा विस्तार करणेस परवनागी मिळून बँकेने साजणी येथे नविन शाखेचा शुभारंभ केलेला आहे. तसेच मुख्य शाखेच्या इमारतीत दुस-या मजल्यावरती कॉन्फरन्स हॉल बांधकाम लवकरच बांधून पूर्ण करणेचा निर्धार व्यक केला. तदनंतर नोटीस वाचन उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी केले. सभासदांनी सर्व विषयास एकमताने मंजूरी दिली.
सभेमध्ये मार्गदर्शनामध्ये पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन मा.पी.एम. पाटील यांनी बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच मार्गदर्शन भाषणात मा.श्री. स्वप्नीलजी आवाडे यांनी स्व. आप्पासो मगदूम काकांनी आखून दिलेल्या पध्दतीने बँक चालवित आहात असे नमुद करून बँकेस २९वर्षे झाली असलेने बैंक अधिकारी व संचालकांच्या अनुषंगाने सक्सेशन प्लानिंग करावे अशी सुचना केली. त्याचप्रमाणे कासा डिपॉझीट वाढ करणे, नफा वाढीकरीता कर्जवाटप वाढवून सीडी रेशो वाढविणेची सुचना केली. बँकेच्या कामकाजाबद्दल कौतुक केले व बँकेच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या. सभेमध्ये मंचावरील उपस्थितीत मान्यवरांचा विशेष सत्कार करणेत आला. त्याचप्रमाणे रोटरी सेक्रेटरी झालेबद्दल संचालक चंद्रकांत मगदूम तर आदर्श ग्राहक म्हणून श्री. नरसू खोकडे त्याचप्रमाणे आदर्श कर्मचारी म्हणुन विनायक शेटे यांचा सत्कार करणेत आला.
शेवटी संचालक श्रेणिक मगदूम यांनी सभासदांना सर्व विषयास मंजूरी दिल्याने व आवाडे परिवाराचे बँकेस कायमपणे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले.सदर सभेस संचालक श्री. कुंतिलालजी पाटणी, सुदर्शन खोत, अनिल बम्मण्णावर, श्री. संपत कांबळे श्री गुरुनाथ हेरवाडे, श्री. सुचित हेरवाडे, तसेच संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले, बीओएम सदस्य श्री. उमेश कोळी, सतिश मगदूम, अॅड. पवनकुमार उपाध्ये तसेच माजी चेअरमन श्री. बाळासो सिध्दाप्पा चौगुले, डॉ. पारीसा बडबडे, डॉ. जयकांता बडबडे, शंकर हजारे, सभासद गुंडू मणेरे, जयकुमार काडाप्पा, संजय कुडचे, यशवंत दाडमोडे, बाबू रूग्गे, प्रधान माळी, मोहन चौगुले, सीईओ जिवंधर चौगुले मॅनेजर श्री. निलेश बागणे उपस्थित होते.सभेचे सुत्रसंचालन श्री. तिर्थंकर माणगांवे यांनी केले.