3 हजाराची लाच स्वीकारणारा ग्रामपंचायतीचा शिपाई ‘लाच लुचपत’ च्या जाळ्यात

हॉटेल च्या नुकसानीचा पंचनामा करिता नाहरकत दाखला देण्यासाठी स्वीकारली लाच

कोल्हापूर: रेणू पोवार

 महापुरात नुकसान झालेल्या हॉटेल परमिट रूमचा पंचनामा करीता नाहरकत दाखला देण्यासाठी आंबेवाडी ता.करवीर ग्रामपंचायतीचा  शिपाई  शिवाजी दत्तात्रय चौगले, वय ४३,  रा. आंबेवाडी, ता. , जिल्हा कोल्हापुर यांने  तक्रारदार यांचेकडे 3 हजाराची लाच मागणी होती. तक्रारदार याबाबतची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली होती . त्या नुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाचखोर शिवाजी चौगले याला रंगेहाथ पकडले.

या बाबत अधिक माहिती अशी कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी आलेल्या महापूरामुळे तक्रारदार यांचे हॉटेल परमीटरुम, बीयर बार मध्ये पावसाचे पाणी आल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते. सदर हॉटेल परमीटरूम बीयर बार च्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याकरीता हॉटेल व्यवसाय सुरु असलेबाबतचा सरपंचाच्या सहीचा ना-हरकत दाखला जोडणे आवश्यक असल्याचे माहीती तक्रारदार यांना मिळाल्याने सदरचा सरपंचाच्या सहीचा नाहरकत दाखला मिळणेकरीता तक्रारदार यांनी आंबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये जावून चौकशी केली त्या ठिकाणी उपस्थित शिपाई शिवाजी चौगले यांनी सदरचा दाखला देणेकरिता सरपंच श्री. मुजावर व माझे करिता ३,०००/-रुपये द्यावे लागतील तरच तुला दाखला मिळेल असे सांगुन ३०००/-रूपये लाचेची मागणी केली होती. सदर बाबत तक्रारदार यांनी दि. २४.०८.२०२१ रोजी लाच लुचपत विभागाकडे अर्ज दिला होता.

तक्रारदार यांचे तक्रारीप्रमाणे दोन पंच साक्षीदारांचे समक्ष दि. २४/०८/२०२१ रोजी आंबेवाडी गावामध्ये असले माने यांचे बिल्डीग मटेरियलचे दुकानासमोर आंबेवाडी ग्रामपंचयात कार्यालयाचे शिपाई शिवाजी चौगुले यांचे लाच मागणीबाबत पडताळणी केली असता, शिवाजी चौगले यांनी तक्रारदार यांचे हॉटेल परमीटरुम, बीयर बार हा व्यवसाय सुरू असलेबाबतचा सरपंचाच्या सहीचा ना-हरकत दाखला देणेकरीता तक्रारदार यांचेकडे रु. ३,०००/- लाच मागणी केलेचे निष्पन्न झाले.

नमुद प्रकरणी तक्रारदार यांचे फिर्यादीवरून आरोपी लोकसेवक शिवाजी दत्तात्रय चौगले, वय ४३, शिपाई आबेवाडी ग्रामपंचायत, ता. करवीर, जि. कोल्हापूर, रा. शिवनगर आंबेवाडी, ता. करवरी, जिल्हा कोल्हापुर यांचेविरुध्द करवीर पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई मा.श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे,मा.श्री सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे व मा. श्री सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार श्री. आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, सतिश मोरे पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर, पोहेकॉ अजय चव्हण, पो .ना. सुनिल घोसाळकर, पो .ना. कृष्णात पाटील व पो .का रूपेश माने, अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे

सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की, लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तकारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खालील कंमाकावर संपर्क साधावा.

१)मा.महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, म.रा.मुंबई टोल फ्री क्रमांक :- १८००२२२०२१

२)मा.पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र, पुणे दुरध्वनी क्रमांक :- ०२०/२६१२२१३४, ०२०/२६१३२८०२, ०२०/२६०५०४२३.

३)श्री. आदिनाथ बुधवंत, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर मो.नं. ९०११२२८३३३,