रिक्षाचालकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळालेले घवघवीत यश

कोल्हापूर :प्रतिनिधी

दि. १९ जून :दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लीम बोर्डिंग), कोल्हापूर संचलित,नेहरू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर, येथे शिक्षण घेणारी रिक्षा चालकाची मुलगी ७९% गुण घेऊन एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२ परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले. एस.एस.सी परीक्षा मार्च २०२२ मध्ये दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्ली बोर्डिंग), कोल्हापूर संचालित नेहरू हायस्कूल, कोल्हापूर मध्ये शिक्षण घेणारी रिक्षाचालकाची मुलगी कु. हफिजा अल्लाउद्दिन मुजावर हिने  ७९% गुण मिळवून यश प्राप्त केले.

तिचे वडील श्री. अल्लाउदि खुतुबुद्दिन मुजावर हे प्रयाग चिखली या ठिकाणी राहतात. कोल्हापूर या ठिकाणी रिक्षा चालवू आपला चरितार्थ चालवितात. आपल्या मुलीने शिकावे या करिता त्यांची धडपड चालू असते. या करिता दररोज प्रयाग चिखली ते नेहरू हायस्कूल, कोल्हापूर पर्यंत तिला सोडणे व परत घेऊन जाणे हा त्यांचा रोजचा नित्यक्रम .मुलीने शिकून मोठे व्हावे हि त्यांची इच्छा.ते करीत असलेल्या प्रयत्नांना मुलीने ७९% गुण मिळवून त्यांचा प्रयत्नांना यश मिळवून दिले. दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लीम बोर्डिंग), कोल्हापूर स्थापन करीत असताना राजर्षी छ. शाहू महाराजांनी मुस्लीम बहुजनांनी शिक्षण घ्यावे व पुढे जावे हि इच्छा या निमित्ताने पूर्ण होत असल्या बाबतच समाधान संस्थेचे चेअरमन मा. श्री. गणी आजरेकर यांनी बोलून दाखविली. या प्रसंगी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व संचालक यांनी आनंद व्यक्त केला.