इचलकरंजी : संजय आंबे
दि. १५ इचलकरंजी महानगरपालिका आणि रवी रजपुते सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणून शहरातील हृदयरोग तज्ञ डॉ.श्रीधर जाधव यांनी आपले बहुमोल मार्गदर्शन करताना महानगर पालिकेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करावे तसेच बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या,मोड आलेली कडधान्ये आणि शक्यतो पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर केल्यास वजन कमी होवून आपली कार्यक्षमता वाढेल .त्याचबरोबरीने आपल्या व्यसनाचे अनुकरण आपली मुले करण्याची शक्यता असल्याने व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले.
मनोज सुतार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भौतिक सुखाच्या मागे न लागता आपण आपल्या जीवनाचा आनंद उपभोगुन घ्यावा कारण आपले शरीर हे ईश्वराने दिलेले दान आहे ते शरीर आपण जपुन वापरले पाहिजे, व्यसनामुळे आपल्या शरीराचे आणि पर्यायाने आपल्या जीवनाचे नुकसान करून घेवु नका
असे आवाहन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी आपण सर्वांनी वाईट गोष्टींचा त्याग केलेस आपले जीवन आनंदमय होईल. प्रामाणिकपणाने आपले काम करुन आपले घर मंदिरात सारखं बनवा त्याचबरोबरीने आपली पुढील पिढी सुसंस्कृत होणेसाठी प्रामाणिक प्रयत्न करा. तसेच व्यसनमुक्त राहुन आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि महानगरपालिकेच्या वारसा हक्काने मिळणाऱ्या नोकरीच्या मागे न लागता आपल्या मुलांना चांगले शिक्षण देवून सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध विनोदवीर नितिन कुलकर्णी यांनी आपल्या हसतमुखी सदासुखी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत आयोजक माजी उपनगराध्यक्ष रजपुते यांनी केले तर सुत्रसंचलन कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी केले.
या व्यसनमुक्ती आरोग्य शिबीरासाठी महानगरपालिका उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, महानगर पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी,
सर्व स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड इन्स्पेक्टर, सर्व महिला आणि पुरुष सफाई कर्मचारी त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.