मानवी हक्क दिन संपन्न
रत्नागिरी दि. 10 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज मानवी हक्क दिन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्याच्या उद्देशाने मानवी हक्क दिन साजरा केला जातो.
यावेळी ॲङ आशिष बर्वे यांनी मानवी हक्क दिन का साजरा केला जातो, नागरिकांची मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आदिबांबत माहिती दिली.