इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेस ७१ लाख ७ हजार रुपये इतका भरघोस निव्वळ नफा

सभासदांना 15 टक्केप्रमाणे डिव्हिडंड : चेअरमन सुर्यकांत साखरे यांची माहिती

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि .७ जुलै :इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेने सभासद, ठेवीदार व हितचितकांच्या विश्‍वासाचया बळावर चौफेर प्रगती केली आहे. संस्थेकडे १७ कोटी २४ लाखाच्या ठेवीच्या आहेत. संस्थेची थकबाकी नाममात्र म्हणजेच ००.२५ टक्के इतकी असुन नेट एनपीए शुन्य टक्के आहे. आर्थिक वर्षात संस्थेला सर्व खर्च वजा जाता७१  लाख ७  हजार रुपये इतका भरघोस निव्वळ नफा झालेला आहे. त्यामुळे यावर्षी देखील सभासदांना १५  टक्केप्रमाणे डिव्हिडंड जाहिर करण्यात आला असल्याची माहिती संस्थचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी दिली.
येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कृष्णा मल्टिपर्पज हॉल याठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री. साखरे बोलत होते. त्यांनी, संस्थेचे वसुल भाग भांडवल ७७  लाख २५  हजार इतके असून राखीव व इतर निधी४ कोटी ७२  लाख इतका आहे. संस्थेचे खेळते भांडवल २५ कोटी २३ लाख इतके असून अहवाल सालात ९  कोटी ७४  लाख इतकी गुंतवणुक केली आहे. येणे कर्ज १३  कोटी ३१  लाख इतके असल्याचे सांगितले.
प्रांभी ज्येष्ठ संचालक विलासराव गाताडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फोटोपुजन करून सभेस सुरवात झाली. अहवाल सालात दिवंगत सभासद व मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करणेचा ठराव शाखा सल्लागार सागर मुसळे यांनी मांडला. नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन व्यवस्थापक विश्‍वनाथ रोडे यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजुर करणेत आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीने करणेत आला.
सभेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक जवाहर छाबडा, आजरा अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन किशोर भुसारी, दि. इचलकरंजी मर्चटस बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, संचालक चंद्रकांत बिंदगे, राजकुमार पाटील, व्यंकटेश शहापुरकर, जयप्रकाश शाळगांवकर, राजेंद्र शिरगुप्पे, श्रीमती शोभा कडतारे तसेच बंडोपंत लाड,  दत्तात्रय कुंभोजे, बाबासो पाटील (वखारवाले), राजेंद बचाटे, अ‍ॅड. डी. के. कंदले, शामराव कुलकर्णी, बाळासो कलागते, संस्थेचे संचालक सर्वश्री. बाळासो बरगाले, दिलीप वणकुंद्रे, सुभाष तोडकर, शशिकांत शेटके, विलास चव्हाण, सुभाष पाटील, नकुल झेले, आशिष पाटील, सौ. सुवर्णा म्हेतर, सौ. भारती शिंदे, तज्ञ संचालक धन्यकुमार पाटील, अमर सडगर उपस्थित होते. शेवटी आभार व्हा. चेअरमन संजय वठारे यांनी मानले