लांजा: प्रतिनिधी
शहरातील नासीर मुजावर याने पत्रकारीता पदविका अभ्यासक्रमात यश मिळवत ९९.७५ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान प्राप्त केला आहे. नासीर मुजावर ऋनयांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे अधिकृत अभ्यासकेंद्र दैनिक रत्नभूमी जर्नालिजम कॉलेज रत्नागिरी मधून हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
नसिर मुजावर याचे प्राथमिक शिक्षण जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे व माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे झाले आहे. त्यानंतर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा मधून त्याने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आहे. तसेच आता त्यांच्या पत्रकारीता पदविका परीक्षेतील या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.