स्वराज्य महिला संघटना कोकणच्या अध्यक्ष पदी सौ. स्मिता संतोष सुतार यांची निवड

कडवई :-मुजीब खान

संघटना कोकण ही सामाजिक क्षेत्रातील तरुणांची संघटना म्हणून ओळख निर्माण केली असून आता महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना रोजगारदेण्यासाठी तसेच अडचणींना एक मेकाला मदत करण्यासाठी स्वराज्य महिला संघटना कोकण ची स्थापना करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ तेलीवाडी मधील सौ. स्मिता संतोष सुतार यांची कोकण च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महिला बचत गट स्थापन करुन त्यामाध्यमातून लघुउद्योग चालू करून महिलांना रोजगार देणे , महिलांना अडअडचणींना मदत करणे हि सर्व कामे पाहून स्वराज्य महिला संघटना कोकणच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सौ. स्मिता संतोष सुतार यांचे अभिनंदन व पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देताना स्वराज्य संघटना कोकण संस्थापक अध्यक्ष अविनाश दादा गुरव, संघटना सहसचिव विशाल शिलकर, प्रसार माध्यम प्रमुख प्रणय उजगावकर,संतोष सुतार, अनिकेत झगडे,सचिन रहाटे, ऋषि पांचाळ, शैलेश हरेकर, रोहित उजगावकर,प्रदिप उजगावकर, समिर झगडे, प्रितेष उजगावकर, दिपक पांचाळ, प्रणित पांचाळ, सिध्देश पांचाळ, दिलराज सुतार उपस्थित होते.