जवळार्जुन गावात १०० टक्के लसीकरण

पुरंदर: श्रीकांत राणे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री. अजितदादा पवार, बारामती लोकसभेच्या संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य मंत्री ना. श्री. राजेशभैय्या टोपे यांच्या माध्यमातून आणि युवा नेते अजिंक्यभैय्या टेकवडे यांच्या प्रयत्नातून जवळार्जुन येथे लसीकरण मोहीम पार पडली.

जवळार्जुन ता. पुरंदर जि. पुणे गावातील जवळपास ५३० नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले होते. या सर्वांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अजिंक्यभैय्या अशोकराव टेकवडे मित्र परिवाराच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आले

यावेळी सोमनाथ कणसे (सरपंच )जवळार्जुन, श्रीकांत राणे पाटील (पोलीस पाटील )जवळार्जुन, सचिनदादा टेकवडे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ राणे, प्रमोद राणे, शशिकांत टेकवडे, गुलाब नाना टेकवडे, ओंकार टेकवडे, पंकज टेकवडे, सुजित रमेश राणे, श्री. सुमित खिलारे, आरोग्य अधिकारी, श्री.आबासाहेब राजवाडे, ,श्री. एस आर शिवली आरोग्य निरीक्षक, श्रीमती मयुरी बजरंग ठाणेकर आरोग्य सेविका, मंदाकीनी यादव आरोग्य सेविका हे उपस्थित होते.