यड्राव: राम आवळे
दि .५ यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीमध्ये सोमवार (ता.९) रोजी शरद स्टार्टअप केंद्राअंतर्गत स्टार्टअप प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.आतंरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीचे मॅनेंजर, एच.आर. यांच्या व उद्योजकांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थीतीत राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षामध्ये इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक व कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्ष ते अंतीम वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हजार पेक्षा अधिक प्रोजेक्ट तयार केले आहेत. त्यामधील स्टार्टअप रेडी प्रोजेक्टस प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध औद्यागिक क्षेत्रातील शेकडो उद्योजकांना व तज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहीती संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी दिली.
”महाविद्यालयातील विद्यार्थी उद्योजक व तंत्रज्ञ बनण्यासाठी महाविद्यालयाने अध्यावत अध्ययन व अध्यापन पध्दती विकसित केली आहे. तसेच २०११ पासूनच प्रोजेक्ट बेस्ड लर्निग (पीबीएल) संकल्पना राबविण्यात आली आहे. या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळत आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानाची माहीती होण्यासाठी, प्रशिक्षण मिळण्यासाठी महाविद्यालयात जगभरातील विविध ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ची व इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तसेच औद्यागिक व शैक्षणिक क्षेत्रातील अंतर (गॅप) कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध समस्यांवरील प्रोजेक्ट करण्यास दिले आहेत. सर्व विभागाच्या नाविन्यपूर्ण व औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर निराकरण करणारे प्रोजेक्ट बनविले आहेत. त्यामधूनच ‘स्टार्टअप’ साठी प्रोजेक्ट तयार झाले आहेत. महाराष्ट्रातून विविध औद्यागिक क्षेत्रातील उद्योजकांकडून सल्ला घेवून त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नवीन उद्योजक निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे.