मनसेच्या वतीने भव्य उद्योजकता मेळावा संपन्न

फक्त राजकारण करत नाही तर सामाजिक समस्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करतो -हेमंत गडकरी .

हिंगणा : प्रतिनिधी

दि. २३ जुलै :मनसे फक्त राजकारण करत नाही तर सामाजिक समस्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करतो.विविध राजकीय पक्षांना त्यांचे आमदार ,खासदार सांभाळता येत नाही ते महाराष्ट्र कसे सांभाळणार ? आम्ही ज्या समाजासाठी राजकारण करतो त्यांना रोजगार मिळावा किंवा त्यांनी स्वतःचा आपला लहानमोठा उद्योग सुरु करुन इतरांनाही रोजगार प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही लढत असतो.आणि म्हणुनच आम्ही भव्य उद्योजकता मेळावा  घेतलेला आहे.असे प्रतिपादन मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले

वानाडोंगरी येथील पालकर सभागृहामध्ये मनसे हिंगणा विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित उद्योजकता मेळाव्याच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.याप्रसंगी हिंगणा एमसिइडीचे प्रकल्प अधिकारी हेमंत वाघमारे ,बार्टीचे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले ,महात्मा फुले महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक योगीता काकडे ,नायक निधी बँकेचे अध्यक्ष चंदु पाटील,सि.ए.कपील माहेश्वरी,ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक वानखेडे ,उद्योग भवनचे अधिकारी आठवले,कृषी उपसंचालक उपरीकर ,यशस्वी उद्योजिका सुप्रीया कुर्वे,महात्मा फुले महामंडळाच्या योगीता काकडे,मनसे जिल्हाध्यक्ष किशोर सरायकर,जिल्हा उपाध्यक्ष अजय सिरसवार ,शहराध्यक्ष अजय ढोके ,मनसे प्रमुख सचिन धोटे,तुषार गिर्हे,पटवर्धन गुरुजी व धनराज ठाकरे उपस्थित होते.उपस्थित सर्व खात्यांच्या अधिकार्यांनी स्वयंरोजगारावर व उद्योजक कसा उभारायचा यासाठी काय करावे लागते? याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले.सदर मेळाव्याचे आयोजक मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे यांनी संचालन तर अजय सिरसवार यांनी आभार मानले.हा मेळावा यशस्वीतेसाठी रोशन वडुले ,गणेश बरवडकर ,रोशन निघोट ,मुकेश देवगडे ,विजय कामठे, निलेश्वर भोयर,सोपान टिकार,अमर खंडाळ,अर्जुन सिंग ,श्रीकांत बुधे,गौरव लांडगे ,अविनाश चिंचुलकर,विनोद समर्थ,चेतन मानकर ,आकाश निघोट ,सागर शेंदरे ,नितीन भिवापुरे,राकेश सिंग,राजु अढाऊ ,अरविंद फुसे व निलेश इंगळे यांनी प्रयत्न केले.