ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त राजापूरमध्ये भव्य जुलूस रॅली – आमदार डॉ. राजन साळवींची उपस्थिती आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

 

राजापूर:१७/०९/२०२४

 

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलादुन्नबी म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन, जो इस्लामिक कालगणनेतील तिसऱ्या महिन्यात, रबीउल अव्वलच्या १२ तारखेला साजरा केला जातो. हा दिवस इस्लामिक जगतात एक पवित्र दिवस मानला जातो.

 

यंदा ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने राजापूर शहरात भव्य जुलूस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी आवर्जून उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने शांतता, बंधुभाव, आणि समाजात सद्भावना जपण्याचा संदेश देण्यात आला. राजापूरमधील मुस्लिम समाजाने या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.