कडवई:
मध्य रेल्वे, मुंबई मंडळातील ठाणे रेल्वे स्थानकावर *MSF स्टाफ अनिकेत कदम* यांनी दाखवलेल्या धाडसाचे व कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*प्रशस्ति प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने सन्मानित*
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी ड्युटीवर असताना अनिकेत कदम यांनी महिला प्रवाशाचा पर्स चोरी करणाऱ्या एका महिला चोराला रंगेहाथ पकडले. चोरट्याने धारदार शस्त्राने हल्ला करून कदम यांना जखमी केले, तरीही त्यांचे धैर्य डगमगले नाही. त्यांनी तिला पकडून *GRP ठाणे* येथे सुपूर्द केले. या शौर्यपूर्ण कार्यासाठी कदम यांना *प्रशस्ति प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने सन्मानित* करण्यात आले आहे.
*गावाचा गौरव करणारा सुपुत्र*
अनिकेत कदम हे *चिपळूण तालुक्यातील निवळी गावाचे अनंत दगडू कदम यांचे सुपुत्र* आहेत. त्यांच्या या कार्यामुळे गावाच्या नावाला नवा गौरव प्राप्त झाला आहे.
रेल्वे मंडळ व स्थानिक नागरिकांनी कदम यांच्या शौर्याचे मनःपूर्वक कौतुक केले असून, त्यांनी समाजात प्रेरणा निर्माण केली आहे.