इचलकरंजी –हबीब शेखदर्जी
दि .३०: व्यापार, उद्योगातील चढउतार, आर्थिक मंदी, नवीन येणारी आव्हाने याचा बँका व पत संस्था यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असताना सर्व प्रसंगावर मात करून सभासद, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांच्या विश्वासाच्या बळावर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत संस्थेने प्रगतीची वाटचाल सुरु ठेवली आहे, असे प्रतिपादन श्री बसवेश्वर नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी केले.
श्री बसवेश्वर नागरी सहकारी पत संस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना अध्यक्ष दत्तवाडे बोलत होते. यावेळी वीरशैव उत्कर्ष मंडळ इचलकरंजीचे अध्यक्ष गजानन सुलतानपुरे व जिल्हा बँकेचे माजी संचालक विलास गाताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अहवाल वाचन करताना अध्यक्ष दत्तवाडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेचे २३६६ सभासद असून संस्थेकडे अहवालसाल अखेर १२ कोटी ५६ लाख ९६ हजार ५४४ इतक्या ठेवी आहेत. संस्थेला ७१ लाख ६ हजार ९१३ इतका ढोबळ नफा झाला असून सर्व खर्च वजाजाता २८ लाख ६ हजार ९१३ इतका निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन संस्थेचे चिटणीस बंडू माळी यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन विजय हावळे यांनी केले.
याप्रसंगी किशोर पाटील, नंदू पाटील, पांडुनाना बिरंजे, डी. एम. बिरादार, शितल दत्तवाडे, संचालक मलगोंडा पाटील, अशोक चनविरे, निवृत्ती गलगले, चंद्रकांत माळी, वैभव हावळे संदीप तोडकर, हर्षल माने, महेश वाली, सुरेखा दत्तवाडे, सरस्वती माळी, सुशांत देवनाळ आदींसह सभासद उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष दत्तात्रय कुंभोजे यांनी मानले.